पुणे विभागातील १ हजार २३७ कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी

0
8

पुणे दि.11 :-पुणेविभागातील 1 हजार 237  कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या  3 हजार 365 झाली आहे. तर ॲक्टीव्ह रुग्ण 1  हजार 953 आहेत. विभागात कोरोना बाधित एकूण 175 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच  115 रुग्ण  गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी  माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 2 हजार 926  बाधित रुग्ण असून  1 हजार 139   कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या  1 हजार 630  आहे. कोरोनाबाधित एकूण 157  रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच     107 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. 

सातारा जिल्ह्यातील 119  कोरोना बाधित रुग्ण असून 20  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 97 आहे. कोरोनाबाधित एकूण 2  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 264 कोरोना बाधित रुग्ण असून  41  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण  14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 38   कोरोना बाधित रुग्ण असून 28  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 9  आहे. कोरोनाबाधित एकूण 1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील  18 कोरोना बाधित रुग्ण असून 9  बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टीव्ह रुग्ण संख्या 8 आहे. कोरोनाबाधित एकूण  1  रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

आजपर्यत विभागामध्ये एकूण 34 हजार 64 नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 32  हजार  366 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर  1 हजार 671  नमून्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी    28 हजार 969  नमून्यांचा अहवाल निगेटिव्ह असून  3   हजार 365 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.

आजपर्यंत विभागामधील 92 लाख 99 हजार 876 घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले असून त्याअंतर्गत 4 कोटी 2 लाख 32 हजार 714 व्यक्तींची तपासणी केली आहे. त्यापैकी 2 हजार 176  व्यक्तींना अधिक तपासणीसाठी  संदर्भीत करण्यात आले आहे.

परदेशातून आलेल्या व्यक्तीचे विलगीकरण : 

दि.10.05.2020 रोजी परदेशातून एकूण 141 व्यक्तीचे विभागामध्ये आगमन झालेले आहे. या सर्वांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आलेले आहे.

परप्रांतीय व्यक्तीसाठी रेल्वेची सुविधा : – 

दि. 11.05.2020 रोजी दु. 4.00 वाजेपर्यंत पुणे विभागातून मध्यप्रदेशासाठी – 4, उत्तरप्रदेशासाठी – 2, उत्तराखंडसाठी -1, तमिळनाडूसाठी -1 अशा एकूण 8  रेल्वे रवाना झालेल्या आहेत. तसेच  दि.11.05.2020  रोजी  सायं 5.00 वा.जबलपूर  (म.प्र.) साठी  व  रात्री 10.00 वा. जयपूर (राजस्थान) साठी  रेल्वेगाड्या रवाना होत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here