ठाणे- कोरोना महामारीमुळे अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय. कोरोनामुळे प्राण गमावणाऱ्यांमध्ये सामान्य नागरिक तर आहेतच मात्र यामधून सिने कलाकार, पोलिस, आरोग्य कर्मचारी हे देखील वाचले नाहीत. अशात गेल्या काही दिवसात आपल्या समोर बातम्या आल्यात त्या महाविकास आघाडीतील मंत्र्यांना झालेल्या कोरोनाबाबत. सुदैवाने जितेंद्र आव्हाड आणि अशोक चव्हाण हे दोघेही मंत्री कोरोनमुक्त झालेत. मंत्री, नेते मंडळी, राजकारणी यांचा थेट नागरिकांशी संपर्क येत असतो
ठाण्यातल्या राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. मागच्या 15 दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. तेव्हापासून एका रूग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र त्यांची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली आहे.
27 मे रोजी त्यांनी कोरोनाची लागण झाल्याचं स्वत: त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून सांगितलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा वसा घेतलेल्या मला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाच्या पुण्याईने मी लवकरच आपल्या सेवेकरिता पुन्हा रुजू होईन, असं ते म्हणाले होते.
दरम्यान, 27 मे ते 10 जूनपर्यंत त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र आज त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या मृत्यूने ठाणे आणि कळवा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. तर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी देखील शोक व्यक्त केला आहे.