मोबाईल रिचार्ज करता येणार तसेच पुस्तके, पंखा ची दुकाने सुध्दा होणार सुरू.

0
9

पुस्तक पंख्याची दुकाने आता सुरू ठेवण्यात येणार आहेत.सरकार फक्त अत्यावश्यक सुरू ठेवण्याचे आदेश दिले होते इतर नागरिकांना बाहेर पडण्यास सकत मनाई आहे त्यात थोडी सुट देऊन पुस्तके पंखा व रिचार्ज ची दुकाने सुरू ठेवण्यात येतील.

सध्या उन्हाळा सुरू असल्याने पंख्याची गरज भासत असते म्हणून पंख्याची दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत.तसंच ज्या घरात ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांच्या बँकेतील खात्यांचं काम करणारे आणि अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या सहसचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी माहिती दिली आहे की लॉक डाउन च्य काळात विद्यार्थांना पुस्तके वाचत यावीत म्हणून पुस्तकी दुकाने सुद्धा उघडी ठेवण्यात येणार आहे.तसेच मोबाईल प्रीपेड रिचार्ज ची दुकाने सुध्दा उघडी ठेवण्यात येतील.

केंद्र सरकार ची परवानगी आहे की पिठाच्या गिरण्या तसेच ब्रेड चे कारखाने सुरू ठेवावे.त्यांनतर गृहमंत्रालयाने डॉक्टर आणि वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांना आवश्यक ती सेवा पुरवावी अस प्रत्र सुध्दा राज्यांना पाठवले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here