मुंबई दि. 7 -महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभारण्याचे काम दादर मधील इंदूमिल स्थळी होत आहे. या स्मारक कामाचा व्हिडियो कॉन्फ्रान्सद्वारे आढावा उद्या सोमवार दि. 8 जून रोजी दुपारी 1 वाजता रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले घेणार आहेत. झूम मीटिंगद्वारे आयोजित करण्यात आलेल्या या व्हिडियो कॉन्फरन्स मध्ये केंद्रीय राज्यमंत्री ना रामदास आठवले हे एमएमआरडीएच्या अतिरिक्त महानगर आयुक्त सोनिया सेठी ;एमएमआरडीए चे मुख्य अभियंता निमसे; मुंबई महापालिकेचे उपायुक्त नरेंद्र बर्डे; आर्किटेक्ट शशी प्रभू; महापालिका सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर; शापुरजी पालनजी कंपनीचे व्यवस्थापक बरूनपाल चौधरी; शिल्पकार अनिल सुतार; आदी अधिकारी या व्हिडियो कॉन्फरन्स मध्ये सहभागी होणार आहेत.