अहमदनगर | प्रबोधनकार निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. यावरच भाजप कार्यकारिणीचे सदस्य वैभव पिचड यांनी इशारा दिला आहे.महाराजांवर दाखल झालेल्या गुन्हा मागे घेण्याची मागणी वैभव पिचड यांच्याकडून करण्यात आलेली आहे. अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा त्यांनी केला.
अकोला चे तहसीलदार मुकेश कांबळे यांच्यासोबत वैभव पिचड यांची भेट झाली. तेव्हा त्यांनी या मागणीचे निवेदन केले .यावेळी भाजप तालुकाध्यक्ष सिताराम भांगरे तसेच तालुका सरचिटणीस भाऊसाहेब वाकचौरे आणि दीपक महाराज देशमुख हे सर्व उपस्थित होते.
निवृत्ती महाराज इंदुरीकर हे तालुक्याचे भुषण आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेक प्रवचनाच्या माध्यमातून कित्तेक गेली वर्षे प्रबोधनाचे काम करत आले आहेत .तसेच राज्य शासनाने त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित केलेले आहे. त्यांचे वाढती लोकप्रियता विरोधकांना सहन होत नसल्याने त्यांच्यावर विविध प्रकारचे खोटे गुन्हे दाखल करण्यात येत आहे. असा आरोप वैभव पिचड यांनी केला.
भागवत धर्माचा प्रचार प्रसार करणाऱ्या साधुसंतांना त्रास देऊ नये. तसेच इंदुरीकर इंदुरीकर महाराजांवर गुन्हा सुद्धा मागे घ्यावा .नाहीतर वारकऱ्यांच्या कडून राज्यभर आंदोलन छेडण्यात येईल. भूमिपुत्र म्हणून आम्ही सुद्धा त्यात अग्रभागी राहू .असं वैभव पिचड म्हणाले.
इथे ही वाचा
पुणे शहरात काल दिवसभरात कोरोना रूग्णांमध्ये उच्चांकी वाढ, आतापर्यंतचा रेकॉर्ड मोडला!
राष्ट्रीयत्व, धर्मनिरपेक्षता व नागरिकत्व या विषयांवरील धडे अभ्यासक्रमातून वगळणार – राजेंद्र पातोडे
काळा बाजाराला केंद्र सरकारकडून प्रोत्साहन – वंचित बहुजन आघाडी