इंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी….

Spread the love

अहमदनगर | प्रसिद्ध कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांना अखेर आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टाची पायरी चढावी लागणार. संगमनेर न्यायालयाने इंदुरीकर यांना 7 ऑगस्टला आपली बाजू मांडण्यासाठी कोर्टात हजर राहावे असे आदेश दिले आहेत.

आपली योग्य ती बाजू मांडण्यासाठी इंदुरीकर महाराजांनी न्यायालयाच्या समोर याव अशी, संगमनेर न्यायालयात आज सुनावणी पार पडली. तसंच इंदुरीकरांना न्यायालयाने समन्स देखील बजावलं आहे.

पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत सापडले आहेत. इंदुरीकर महाराजांना कोर्टाने पुत्रप्राप्तीच्या वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी हे आदेश दिलेले आहेत.

दुसरीकडे या सगळ्यानंतर आता इंदुरीकर महाराज समर्थक आक्रमक झाले आहेत.इंदुरीकर महाराज समर्थकांकडून इशारा देण्यात आलेला आहे की जर महाराजांवरील गुन्हा मागे घेतला नाही तर आंदोलन करण्यात येईल.

इथे ही वाचा

“प्रियांका गांधी यांना या राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून जाहीर करा”

CA परीक्षेबाबत निर्णयाची शक्यता….

भाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published.