भाजपचे ‘इतके’ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | भाजपचे अनेक आमदार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचा गौप्यस्फोट जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केलाय.

खासगीत बऱ्याच जणांनी खडसेंबरोबर राष्ट्रवादीत यायची इच्छा व्यक्त केली आहे. जे खडसेंचे नेतृत्व मानतात ज्यांना राष्ट्रवादीत येण्यात काही अडचण नाही असे लोक राष्ट्रवादीत दाखल होतील, असं जयंत पाटलांना सांगितलं आहे.

कोरोनाकाळात विधानसभेची निवडणूक घेणं परवडणार नाही त्यामुळे 10 ते 12 आमदारांची घटनात्मक अडचण निर्माण होऊ नये म्हणून हे आमदार यथावकास राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत, असं जयंत पाटलांनी म्हटलंय.

दरम्यान, गेले कित्येक दिवस भाजपचे नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती ती चर्चा आज संपुष्टात आली असून खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केलंय.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: