हा लढा विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हिमतीने लढून जिंकला आहे त्यामुळे सर्व श्रेय हे विद्यार्थ्यांचे आहे. मासू सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते. सर्व प्रसारमाध्यमांचे सुद्धा लाख लाख आभार तुम्ही विद्यार्थ्यांचा आवाज शासनापर्यंत यशस्वीपणे पोहचवला.
आज खऱ्या अर्थाने महाराष्ट्रात विद्यार्थी चळवळ गतिमान होताना दिसत आहे, परिवर्तन अटळ आहे.
हेच विद्यार्थी उद्या महाराष्ट्राला झेंडा अटकेपार रोवतील ह्याची खात्री पटली आहे.
मासु तुमच्या हक्क आणि अधिकारांच्या लढ्यात सदैव सोबत राहील. असे मत मासू चे अध्यक्ष ऍड. सिद्धार्थ इंगळे यांनी व्यक्त केले.
इथे हि वाचा
कंटेनमेंट झोन सोडून सर्वच उघडणार- ठाकरे सरकार चा मेगा प्लॅन
Pingback: "3 जून रोजी गोपीनाथ मुंडेंचा सहावा स्मृतिदिन आहे'" - Times Of Marathi