पोलिसांकडून ट्विटरला पत्र? सुशांतच्या ट्विटर पोस्ट डिलीट….

Spread the love

मुंबई | बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत चे आत्महत्येनंतर मुंबई पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरू आहे,तर आत्महत्या प्रकरना विषयी अनेकांची तपासणी करण्यात आलेली असून ,या प्रकरणाबद्दल सखोल तपासणी करण्यासाठी पोलिसांचे ट्विटरला पत्र.

27 डिसेंबर 2019 रोजी सुशांत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेवटचे ट्विट केलेले होते.सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाबद्दल ची माहिती मिळविण्यासाठी पोलिसांनी या पत्राद्वारे गेल्या सहा महिन्यांच्या ची माहिती मागवली होती तर काही पोस्ट डिलीट केल्याची शंका पोलिसांकडून व्यक्त करण्यात आलेली आहे. या संबंधितच पोलिसांनी ट्विटरला पत्र लिहिले आहे.

सगळ्या बाजूंनी या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास केला जात आहे. आतापर्यंत 22 जणांसोबत आत्महत्या प्रकरणी चौकशी केली गेलेली आहे. त्याचबरोबर सुशांत ने ज्या प्रोडक्शन हाऊस सोबत काम केलं आहे. त्यांच्या काढूनही काही कागदपत्रे मागवली गेली आहेत.

नुकताच सुशांतच्या पोस्टमार्टम चा अहवाल आलेला आहे ज्यामध्ये श्वास गुदमरून मृत्यू झाल्याचे नमूद झालेलं आहे. पोलिसांच्या माहितीनुसार गेल्या सहा महिन्यांपासूनच सुशांतचा डिप्रेशन मध्ये होता त्यावर त्यांने उपचार करायचा सुद्धा प्रयत्न केला होता.

इथे हि वाचा

सुशांतचा मूव्ही ‘दिल बेचारा’ रिलीजिंग ची तारीख ठरली

राष्ट्रवादीत ‘या’ पदासाठी निवडणूक होणार; इच्छुकांकडून मागविले अर्ज

राजेश टोपे यांनी महाराष्ट्राला दिली गुड न्यूज….


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.