आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे

0
5

मुंबई दि.१४- लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये समाजमाध्यमांचा गैरवापर करून आक्षेपार्ह पोस्टस केल्याप्रकरणी ४७७ विविध गुन्हे महाराष्ट्र सायबरने दाखल केले असून २५८ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, अशी माहिती महाराष्ट्र सायबरच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिली.

राज्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये एकूण ४७७ गुन्ह्यांची नोंद कालपर्यंत झाली आहे. जिल्हानिहाय आकडेवारी खालीलप्रमाणे-आक्षेपार्ह संदेश, पोस्टर्स, व्हिडिओ, ट्विट पोस्टस, शेअर केल्याप्रकरणी प्लॅटफॉर्मनिहाय गुन्हे दाखल

व्हॉट्सॲप- 195गुन्हे फेसबुक पोस्ट्स – 195 गुन्हे दाखल टिकटॉक व्हिडिओ- 24 गुन्हे दाखल ट्विटर – आक्षेपार्ह ट्विट – 9 गुन्हे दाखल इंस्टाग्राम – चुकीच्या पोस्ट- 4 गुन्हे अन्य सोशल मीडिया (ऑडिओ क्लिप्स, युट्यूब) गैरवापर – ५० गुन्हे दाखल

वरील सर्व गुन्ह्यांमध्ये आतापर्यंत २५८ आरोपींना अटक.१०७ आक्षेपार्ह पोस्ट्स समाजमाध्यमांवरून हटविण्यात यश पुणे शहरांतर्गत सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये एका नवीन गुन्ह्याची नोंद

पुणे शहरात नोंद झालेल्या गुन्ह्यांची संख्या ५ वर सदर गुन्ह्यातील आरोपीने आपल्या ट्विटर हँडलवर कोरोना महामारीबाबत सरकार ज्या उपाययोजना करत आहेत त्यावर टिपणी करताना त्यास राजकीय रंग देणाऱ्या आशयाचा मजकूर ट्विट केला होता. त्यामुळे परिसरातील शांतता बिघडून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here