मुंबई – सध्या अनलॉक ला सुरुवात झाली आहे तर गर्दी झाल्यास पुन्हा लॉकडाऊन करण्यात येईल असे मुख्यमंत्री म्हणाले होते त्याच पार्श्वभूमीवर देशात पुन्हा 15 तारखेपासून लॉकडाऊन होणार अशी बातमी पसरत आहे. त्यावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकार्यल्यातून प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले मुख्यमंत्री..?
लॉकडाऊन पुन्हा जाहीर केलेला नाही. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जनतेला विनंती व आवाहन केले आहे की कुठेही गर्दी करू नका.शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा आणि स्वतःची काळजी घ्या.
अशी माहिती त्यांच्या कार्यालयातुन ट्विटर व्दारे सांगण्यात आली.