लोणावळा | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व पर्यटन स्थळ बंद आहेत .लोणावळ्यात देखील पर्यटन स्थळांवर सध्या परिस्थितीनुसार बंदी आहे . परंतु अशा परिस्थितीत सुध्दा बारा पर्यटक फिरण्यासाठी आले होते. त्यांच्यावर पोलिसांनी कडक कारवाई केली आहे.
लोणावळा येथे फिरायला आलेल्या 12 पर्यटकांवर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहे .तसेच 23 जणांवर मास्क न लावण्यामुळे कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे .त्यामुळे लोणावळा फिरायला आलेल्या पर्यटकांना चांगलेच महागात पडलेले आहे.
पावसाळ्याला सुरूवात झाली की लोणावळ्या ला प पर्यटकांची गर्दी होते. पावसाळा ऋतु सुरू झाला का, दोन-चार महिने लोणावळा पर्यटकांनी फुलून गेलेला दिसतो.परंतु यावर्षी कोरोना च्या पार्श्वभूमीवर पर्यटकांनी लोणावळा फिरायला येऊ नये. यासाठी पोलिसांनी धरण आणि लायन पॉइंट येथे चेक पोस्ट केलेले आहेत.
कोरोणा संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून लोकांनी घरात बसूनच प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन शासन प्रशासन करत आहे .तसेच लोणावळा पोलिसांनी देखील पर्यटकांना असे आवाहन केले आहे , घरात बसूनच सहकार्य करावे.
इथे ही वाचा
कुरकुरणारी खाट मोडीत निघायचीच…., भाजप नेत्याचं राऊतांना प्रत्युत्तर
राज्य सरकारने घेतला निर्णय..मास्क घातला नाही तर दहा हजार रुपये दंड…
टिक टॉक ला बसला इतक्या हजार कोटींचा फटका…