उज्जैन | मध्य प्रदेश पोलिसांनी कानपूर इन्काऊंटरचा मास्टरमाइंड विकास तुबेला अटक केली आहे.त्यावरच मध्य प्रदेश चे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी पोलिसांचे अभिनंदन केले त्याच बरोबर आमचे सरकार कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाहीत असे सुद्धा ते म्हणाले.
मध्य प्रदेश पोलिसांनी विकास तुबे त्याला पकडले आहे असे वृत्त शिवराजसिंह चव्हाण यांनी उत्तर प्रदेश मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना फोन करून कळवले आहे .या सर्व घडलेल्या प्रकाराची माहिती योगी आदित्यनाथ यांना शिवराज सिंह चौहान यांनी दिली.
आमचे सरकार कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही .ज्यांना कुणाला वाटत असेल की महाकाल देवीला शरण जाऊन आपली पापं धुतली जातील त्यांनी महाकालला जाऊच नये … असे ट्विटरवर ट्विट करत शिवराज चौहान यांनी म्हटले आहे.
विकास तुबे याच्यावर आठ पोलिसांची हत्या केल्याचा आरोप आहे .तेव्हापासूनच विकास तुबे हा फरार होता. परंतु उज्जैन महाकाली मंदिराच्या परिसरात पोलिसांनी अटक केली आहे
इथे ही वाचा
भारतात कोरोनाचं थैमान सुरूच, मागच्या 24 तासांत….
छत्रपती संभाजीराजेंना तिसऱ्या रांगेत जागा, मराठा समन्वयकांचा बैठकीत गोंधळ
या नेत्यांनी दिला इशारा… इंदुरीकर महाराजांवरील गुन्हा मागे घ्या…