महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही:- देवेंद्र फडणवीस

मुंबई : महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही . त्यामुळे राज्य सरकारकडून मराठा आणि ओबीसी समाजाला एकमेकांविरोधात उभे करण्याचे कारस्थान रचले जात आहे , असा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला . भाजपचे सरकार असताना आम्ही मराठा समाजाला आरक्षण देणार कायदा केला . हे करताना ओबीसी समजाच्या आरक्षणाला कुठेही धक्का लावण्यात आला नव्हता . मात्र , आताच्या सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळकाढूपणाचे धोरण अवलंबिले जात आहे . लोकांची समजूत काढता येत नाही म्हणून त्यांच्यात संभ्रम पसरवला जात आहे . यामधूनच मराठा समाजाला आरक्षण द्यायचे मग ओबीसींच्या कोट्यातून द्यायचे का , अशी नवी टूम काढण्यात आल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले .

आज मुंबईत भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक आयोजित करण्यात आली आहे . यावेळी फडणवीस यांनी उपस्थितांना संबोधित केले . यावेळी त्यांनी मराठा आरक्षणासंदर्भातील राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली . तसेच मराठा आंदोलकांचा उद्रेक अगदी योग्य असल्याचेही सांगितले . आंदोलनं ही चर्चेच्या माध्यमातून सुटतात . राज्यकर्त्यांना कायदा करण्याचे अधिकार विधिमंडळाने दिले आहेत . मात्र , महाविकासआघाडी सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नाही , असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले .

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: