महाविकास आघाडीतलं नाराजी नाट्य संपेना, अशोक चव्हाणांनंतर आता हा नेता नाराज…

मुंबई | महा विकास आघाडी वर सुरू असलेले नाराजीचे नाटक काही संपायचं दिसत नाही. . काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री तसंच महाविकास आघाडीतील नेत्यांनी मंत्री अशोक चव्हाण यांची नाराजी दूर केल्यानंतर आता महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेला पिपल्स रिपब्लिकन पार्टी (कवाडे गट) प्रमुख प्रा. जोगेंद्र कवाडे नाराज आहेत. काँग्रेसने सत्तेतील वाटा देतो, असं आश्वासन दिलं होतं. मात्र आता काँग्रेसने आमच्याकडे साफ दुर्लक्ष केल्याची भावना कवाडे यांनी बोलून दाखवली आहे.

त्याचबरोबर कवाडे म्हणाले ,काँग्रेस राष्ट्रवादी सोबत गेल्या 21 वर्षांपासून काम करत आहे. आम्ही पक्ष मित्र आहोत .काँग्रेसने-राष्ट्रवादीच्या खांद्याला खांदा लावून तत्कालीन भाजप विरोधात रान पेटवलं. भाजप विरोधात घणाघाती सभा केल्या .तसेच संपूर्ण महाराष्ट्रात प्रचार केला. परंतु आता काँग्रेस सत्तेत येताच आमचा विसर काँग्रेसला पडलेला आहे. त्यांनी दिलेले आश्वासन आता पूर्ण करावेत व सत्तेतला वाटा आम्हाला द्यावा. आश्वासनाची पूर्तता करावी.

त्याचबरोबर काँग्रेसने आमच्याशी संवाद ठेवावा. तसेच आम्हाला मानसन्मानचा वाटा सुद्धा द्यावा. महाराष्ट्रात जातीयवादी पक्ष सत्तेत येण्यासाठी आम्हीही काँग्रेस राष्ट्रवादी सोबत झंझावाती प्रचार केलेला आहे. तसेच दलित समाजाने देखील काँग्रेसला भरभरून मतदान दिल्याचं कवाडे यांनी सांगितलं.

त्याचबरोबर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने कोरोनाची परिस्थिती हाताळत आहे यावरूनच जोगेंद्र कवाडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे भरभरून कौतुक सुद्धा केलेले आहे.

इथे ही वाचा

पैशांसाठी अडकवून ठेवला होता मृतदेह; अजित पवारांना कळताच 10 मिनिटात मिळाला ताब्यात!

चीनवर पुन्हा एकदा डिजीटल स्ट्राईक, भारत सरकारने आणखी 47 अ‍ॅप्सवर घातली बंदी

“चंद्रकांतदादा एवढं लक्षात ठेवा…मातोश्रीवर टीका करणाऱ्यांचा शेवट नारायण राणेंसारखा होतो”

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: