निसर्ग चक्रीवादळात झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शासनाचे मोठे निर्णय

Spread the love

निसर्ग चक्रीवादळाने रायगड, सिधुदुर्ग, अलिबाग, रत्नागिरी या जिल्ह्याचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले होते.
आजच्या मुख्यमंत्री यांनी पत्रकार परिषदेत विविध निर्णय घेण्यात आले आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत महसूल मंत्री बाळासाहेब थोरात तसेच उपमुख्यमंत्री अजित दादा पवार सह अन्य मंत्रिमंडळातील सदस्य उपस्थित होते.
निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित व्यक्तींना एनडीआरएफ, एसडीआरएफचे दर बाजूला ठेऊन वाढीव मदतीसाठी शासनाने विशेष बाब म्हणून केले निकषात बदल. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम युद्धपातळीवर, नवीन निकषांप्रमाणे सर्वांना मदत देणार. नुकसानग्रस्तांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे आहे असे मुख्यमंत्री म्हणाले.
चक्रीवादळाच्या नुकसान भरपाई यावर घेतलेले निर्णय.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या मोठ्या घोषणा
बदललेल्या निकषांमुळे मदतीत दीड ते तीन पट वाढ होनार.कच्च्या-पक्क्या घराच्या नुकसानीसाठी पूर्वी ९५ हजार १०० रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार.आता १ लाख ५० हजार इतकी मदत मिळणार.

बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपये मिळणार आता ५० हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार. ही नुकसानभरपाई २ हेक्टरच्या मर्यादेत मिळेल.
ज्यांची घरे पूर्णत: क्षतीग्रस्त झाली आहेत त्यांना प्रति कुटुंब कपड्यांसाठी पूर्वी २५०० रुपये तर २५०० रुपये भांडीकुंड्यांसाठी दिले जायचे. आता कपडे व भांडी यासाठी प्रति कुटुंब प्रत्येकी ५ हजार मदत दिल्या जाणार .अंशत: पडझड झालेली घरे तसेच नष्ट झालेल्या झोपडीसाठी पूर्वी ६ हजार देण्यात आले होते तर आता १५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्यात येईन गावात लहान-मोठी दुकाने, टपरी व्यवसाय करणाऱ्यांना नुकसानीच्या ७५ टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत मदत मिळणार .बहुवार्षिक पिकाच्या नुकसान भरपाईसाठी पूर्वी हेक्टरी १८ हजार रुपये, आता ५० हजार रुपये इतकी मदत देण्यात येणार. ही नुकसानभरपाई २ हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येईल .कोकणवासियांना पंतप्रधान आवास योजना, गृहनिर्माण विभाग यांच्यामार्फत पक्की स्लॅबची घरे बांधण्यासाठी मदत करण्याचा प्रयत्न केल्या जाईल
निसर्ग वादळामुळे अडचणीत आलेल्या आदिवासी बांधवांना खावटी कर्जापेक्षा खावटी अनुदान देण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सूचना दिल्या.
रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील नागरिकांना तातडीची मदत म्हणून वीज पुरवठा सुरळीत होईपर्यंत प्रति रेशनकार्ड ५ लिटर रॉकेल मोफत देणार . याशिवाय त्यांना रेशनदुकानातून तांदूळ तसेच इतर धान्य उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतलेला आहे..


Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published.