अरविंद बंसोड मृत्यू प्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सहआरोपी करा !

1
6

नरखेड तालुक्यातील पिपळधरा गावातील अरविंद बंसोड या ३० वर्षीय बौद्ध तरुणाचा दिनांक २७ मे २०२० रोजी संशयास्पद मृत्यू झालेला आहे.यासंबंधातील घटनाक्रम पुढीलप्रमाणे आहे.
दिनांक २७ मे २०२० अरविंद बंसोड त्याचा एक मित्र गजानन राऊत याचेसह एटीएममधून पैसे काढायला गेले होते. एटीएमच्या जवळ एक एचपी गैस एजेंसी आहे.ती त्याच गावातील पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर, जो राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जवळचा कार्यकर्ता आहे, यांच्या मालकीची आहे. अरविंद बंसोड यांनी संबंधित एचपी गैस एजेंसीच्या बोर्डचे फोटो आपल्या मोबाईलवरून घेतले. यामुळे मिथिलेश उमरकरला राग आला. त्याने या कारणावरून अरविंद व त्यांचा मित्र गजानन राऊत यांच्याशी वादावादी करून त्या दोघानाही शिवीगाळ केली. त्यांने आपल्या ३ सोबत्यांना सोबत घेऊन अरविंद व गजानन यांना लाथाबुक्क्याने मारहाण केली. व दोघांचेही मोबाइल हिसकावून घेतले.व ते घटनास्थळावरून निघून गेले.

या घटनेनंतर अरविंदने गजानन याला दुचाकीत पेट्रोल भरून आण मी दोघांचेही मोबाईल मागून घेतो असे म्हणून गजाननला पेट्रोल भरण्यासाठी पाठविले. गजानन पेट्रोल भरून परत आला त्यावेळी अरविंद गैस एजेंसीच्या समोर जमिनीवर पडलेला होता.त्याच्या जवळच एक कीटकनाशकाची बाटली पडलेली होती. त्याच्या भोवती गावातील लोक जमा झाले होते.तसेच ज्यांनी मारहाण केली होती तो पंचायत समिती सदस्य मिथिलेश उमरकर व त्याचे सोबती तेथे हजर होते. त्यांनी अरविंदला स्वत:च्या कार मध्ये उचलूंन बसवले व बाजूला पडलेली कीटक नाशकाची बॉटल सोबत घेतली. मात्र अरविंदचा मित्र गजानन याला गाड़ी मध्ये घेण्यास नकार दिला. मिथिलेश उमरकरने अरविंदला हॉस्पिटल मध्ये एडमिट केले. अरविंद त्यानंतर दोन दिवसांनी दिनांक २९ मे रोजी दवाखान्यात मृत्यू पावला.

या घटनाक्रमात मृतक अरविंदच्या सोबत असलेला गजानन राऊत याने अरविंदच्या कुटुंबातील लोकांना सोबत घेऊन पोलीस स्टेशनमध्ये घटनेची तक्रार नोंदविण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी लगेच तक्रार नोंदवून घेतली नाही.उलट तक्रारकर्त्यानाच धमकावले. अरविंदच्या मृत्यूनन्तर २९ मे ला दुपारनंतर ४.३० वाज़ता पोलिसांनी मिथिलेश उमरकर व त्याच्या साथीदारांविरुद्ध, भादंविसंच्या कलम ३०६ ( आत्महत्येस प्रवृत्त करणे) व ३४ ( संगनमताने गुन्ह्याचा कट रचणे ) या कलमाखाली गुन्हा नोंदविला. संशयित आरोपींना लगेच दुसऱ्या दिवसी ३० मे ला अटकपूर्व जामीन कोर्टाने मंजूर केला.

१) या संपूर्ण प्रकरणाचा घटनाक्रम लक्षात घेतला तर पोलिसांनी गुन्हा नोंदविण्यास दिरंगाई केली आहे हे स्पष्ट होते.

२) गुन्हा नोंदविल्यानंतर पोलिसांनी आरोपींना तत्काळ अटक केली नाही. आरोपीस न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळू नये यासाठी काहीही प्रयत्न केले नाहीत.

३) या प्रकरणात करण्यात आलेल्या तक्रारीत आरोपींनी जातीचा उल्लेख करून शिवीगाळ व मारहाण केली असा स्पष्ट उल्लेख असताना पोलिसांनी अजाज अत्याचार प्रतिबंध कायद्याची कलमे लावलेली नाहीत.

वरील सर्व बाबी पाहता पोलीस आरोपींना वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत हे स्पष्ट दिसून येते. आरोपी व त्याचे वडील सत्ताधारी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी आहेत. व प्रभावशाली राजकीय व्यक्ती आहेत.गावात व परिसरात त्यांचा धाक आहे. आरोपी, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदार संघातील पंचायत समितीचा सदस्य आहे.आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अगदी जवळचा आहे. हे पाहता या प्रकरणात पोलिसांवर प्रचंड दबाव आहे हे स्पष्ट आहे. यामुळे,

१) या संपूर्ण प्रकरणाचा तपास स्थानिक पोलिसांकडून काढून सीआयडी,सीबीआय अथवा अन्य निष्पक्ष तपास यंत्रणांकडे सोपविण्यात यावा.

२) गुन्ह्यात अजाज अत्याचार प्रतिबंध कायद्याची कलमे लावण्यात यावीत तसेच भादंविसंचे कलम ३०२ लावण्यात यावे.

३) आरोपीचा अटकपूर्व जामीन रद्द करण्यात यावा यासाठी न्यायालयात अर्ज करण्यात यावा व आरोपीस तत्काळ अटक करण्यात यावी.

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष जर या प्रकरणात खरेच निष्पक्ष असेल तर पक्षाने आरोपीची राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षातून ताबडतोब हकाललपट्टी करावी.
४) आरोपींना जर गृहमंत्री अनिल देशमुख संरक्षण देत असतील तर त्यानाही या गुन्ह्यात सहआरोपी करण्यात यावे.

सुनील खोबरागडे,
संपादक,दैनिक जनतेचा महानायक
मुंबई
(टीप :- सुनील खोब्रागडे यांनी आपल्या फेसबुक वरून वरील माहिती दिली आहे)
इथे हि वाचा
सोनू सूदला पुढे करुन ‘ठाकरे’ सरकारला अपयशी ठरवण्याचा प्रयत्न; राऊतांचा गंभीर आरोप
गेल्या २४ तासात 1 लाख ४२ हजार रुग्णांची तपासणी तर एकूण आता पर्यंत रुग्ण तपासण्यात आले
आज राज्यात 2739 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ..

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here