त्याला हंसांनी अगोदरच बजावले की

1
3

दोन हंस आपल्या परम मित्र कासवाला पाणी आटलेल्या तळ्याच्या चिखलातून काढून विस्तिर्ण आणी कधीही न आटणाऱ्या जलाशयात नेण्याचा प्रयत्न करीत आहेत ..काठीची टोके आपल्या चोंचीत धरुन कासवाला मध्ये तोंडाने धरायला लावले ..
त्याला हंसांनी अगोदरच बजावले की ..,
तुला लोक चिडवतील , उत्तेजित करतील ..तु बोलावास ..तु प्रतिक्रिया द्यावी असे डिवचतील ..
पण तसे तू अजिबात करू नकोस ..तू प्रतिक्रियावादी बनू नकोस ,,कारण तुझे प्रश्न आणी इतरांचे प्रश्न वेगवेगळे आहेत ,,तसेच हेतू देखील वेगवेगळे आहेत ..त्या विस्तिर्ण जलाशयात पोचल्यावर ,,तुला जे करायचे आहे ..ते तू कर ..पण पोचण्याचे अगोदर बोलण्यासाठी ,.लोकांना प्रत्युत्तर देण्यासाठी तोंड उघडाचे नाही …
बडबड्या धांदूल असणारे ते कासव शेवटी आपल्या प्रतिक्रियावादी स्वभावानूसार स्वताःचाच घात करुन घेते ..
ही इसाप नितीकथा आजही समाज जीवनाला लागू पडते ..
इसाप निती , पचंतंत्र , जातककथा ह्या मानवी समुदायांसाठी संस्कारकथा आहेत ,.बोधकथा आहेत ,..
त्यातून समाजाने सार्वजनिक संदेश घेतला पाहिजे ,.
महेन्द्र शेगांवकर

इथे हि वाचा
पहाटेची अमर्याद ताकद…💪💪💪 तुम्ही सकाळी किती वाजता उठता?
अखेर घरमालकाविरुद्ध गुन्हा दाखल
यावर्षी गणेशोत्सव मंडळांनी घेतला हा निर्णय ?

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here