महाराष्ट्रात दिवसेंदिवस कोरोना बाधितां चा आकडा वाढतो आहे याच आकड्यायावरून भाजपच्या माजी आमदार मेधा कुलकर्णीयांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली व सरकारला काही प्रश्न सुद्धा विचारले.
उत्तर प्रदेशची लोकसंख्या भारताच्या महाराष्ट्राच्या दुप्पट असून सुद्धा तिथे कोरोना बाधित रुग्ण महाराष्ट्रापेक्षा कमी आहेत त्यांनी महाराष्ट्राचे तुलना उत्तर प्रदेश सोबत केली. उत्तर प्रदेशमध्ये 1084 कोरोना बाधित रुग्णआहेत. आणि महाराष्ट्रात चार हजार पेक्षा जास्त आहेत.
हे अपयश सर्वस्वी निकृष्ट नियोजनाचे, अकार्यक्षमतेचे द्योतक आहे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकार वर जोरदार टीका केली.
महाराष्ट्राचे राज्य शासन अपयशी का ठरले ?असा सवाल मेधा कुलकर्णी यांनी महाराष्ट्र राज्य सरकारला विचारला कारण शासनाच्या अधिकृत संशोधनावरून महाराष्ट्र कोरोना बाधित रुग्ण आणि मृत्युदर सर्वाधिक जास्त आहे.(देशाच्या सुमारे 1/4).
त्या अस म्हणायला सुद्धा विसरल्या नाही की राज्य सरकारच्या अपयशाचा कारण ते नागरिकांच्या वर्तनावर फोडू शकत नाही काही नागरिकांमध्ये गांभीर्याचा अभाव असला तरी हे सार्वत्रिक नाही.