हवामान खात्याने दिला इशारा.. येत्या 48 तासात या ठिकाणी होणार मुसळधार पाऊस….

0
4

मुंबई |  संपूर्ण महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झालेली आहे. यातच भारतीय हवामान खात्याने मुंबई आणि महाराष्ट्रातल्या पश्चिम किनारपट्टी ला लक्षात घेता पुढच्या 24 ते 48 तासात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबई आणि पश्चिम किनारपट्टी मध्ये पुढच्या 24 ते 48 तासांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे कारण, मुंबईमध्ये गेल्या 3 तासांमध्ये सकाळी साडे अकरापर्यंत 15 मिमि पावसाची नोंद झाली आहे. सांताक्रुझमध्ये 6 मिमि पावसाची नोंद झाली आहे. अजूनही पश्चिम किनारपट्टीवरच्या भागामध्ये ढग दिसून येत आहेत.

सकाळपासून मुंबईच्या उपनगरांमध्ये धुवाधार पाऊस कोसळला. त्यामुळे किंग्ज सर्कल, सीएसएमटी, हिंदमाता, कलानगरच्या काही भागांत पाणी साचलं. परंतु सध्या परिस्थितीत मुंबईमध्ये पावसाने उघडीप केलेली दिसून येत आहे.

प्रशासनाने नागरिकांना कामानिमित्त बाहेर पडा अन्यथा घरातच बसा असे आव्हान दिले आहे. कारण मुंबईमध्ये जरी पावसाने सध्या उघडीप केलेली असली. तरीही पुढच्या 24 ते 48 तासात मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलेला आहे.

इथे ही वाचा

रिलीजपूर्वीच ‘सडक 2’ वादाच्या भोवऱ्यात, हिंदु समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप

पंतप्रधान मोदी यांचा थेट सीमेवरून चीनला इशारा, ‘विस्तारवादाचं युग संपलं आता….’

इंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी….

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here