दूध दरवाढ आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला

सांगली |स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून दूध दरवाढीच्या मुद्यावरून आज 21 जुलै रोजी दूध बंद आंदोलन ची हाक दिली आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील टँकर फोडाफोड करून सरकारचा निषेध स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आलेला आहे .आज गोकुळ दूध संघाचा टँकर सुद्धा येल्लुर फाट्याजवळ फोडण्यात आलेल्या आहे. २५ हजार लिटर दूध घेऊन हा टँकर मुंबईकडे जात असताना कार्यकर्त्यांनी आंदोलनाला सुरवात केली आहे.

स्वाभिमान यांच्या आंदोलनाला गोकुळ दूध संघाने मंगळवारी दूध संकलन बंद ठेवून आंदोलनाला पाठिंबा दर्शविला परंतु या विरोधात संभाजी ब्रिगेड तक्रार दाखल केली यामुळे गोकुळने पाठिंबापरंतु या विरोधात संभाजी ब्रिगेड तक्रार दाखल केली .यामुळे गोकुळ ने पाठिंबा मागे घेत सकाळी होणारे दूध संकलन व वाहतूक सुरूच ठेवली. यामुळे स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेत संघांचा टँकर फोडून टाकला.

दुग्धव्यवसाय विकास मंत्री सुनील केदार यांच्या अध्यक्षतेखाली दूध दराचा प्रश्न वरून मंत्रालयांमध्ये तातडीने बैठक बोलवण्यात आली आहे शेतकरी आणि दूध संघाच्या समस्या जाणून घेत तोडगा काढण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आलेली आहे.

सध्या राज्यातील कोरोणाच्या पार्श्वभूमीवर दूध व्यवसाय कोलमडल्याचे पाहायला मिळालेल आहे. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची मागणी कमी झाल्यामुळे दूध संघाकडून खरेदीचे दर कमी करण्यात आलेले आहे. या विरोधात दुग्ध व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांनी प्रतिलिटर अनुदान देण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटने कडून करण्यात आलेली आहे.

इथे ही वाचा

दूध दरवाढ आंदोलन; स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दुधाचा टँकर फोडला

सोलापूरमध्ये कोरोनाला हद्दपार करण्यासाठी ‘ही’ संकल्पणा प्रभावीपणे राबवा, मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शरद पवार रामद्रोही, उमा भारतींचं टीकास्त्र

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: