नवी दिल्ली | रामदेव बाबा यांनी शोधून काढलेल्या औषधावर केंद्रीय मंत्रालयाने काही आदेश दिले आहेत .या आदेशावरूनच रामदेव बाबा यांना मोठा धक्का बसला देशभरात कोरोणाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत असताना रामदेवबाबा यांनी पहिले औषध शोधून काढले असल्याचा दावा केला आहे. या औषधाने तीन दिवसातच कोरोना बाधित रुग्ण बरा होईल असं सुद्धा सांगण्यात आलं होतं. परंतु केंद्रीय आयुष मंत्रालय याने या औषधांचे जाहिरात थांबवण्याचे आदेश दिले आहेत.
या औषधावर योग्य प्रकारे चाचणी होत नाही. तोपर्यंत या औषधांची जाहिरात होणार नाही असं केंद्रीय मंत्रालयाने आदेश दिला आहे. पतंजलीने या औषधाला कोरोनील अस नाव दिल आहे .व कारोनील ची जाहिरात होणार नाही.
त्याचबरोबर या औषधाची संपूर्ण क्लिनिकल ट्रायल आलेले नाहीत .तसेच पतंजलीने जाहिरात करण्याआधी पतंजली आयुर्वेद लिमिटेड कंपनीने या औषधाची संपूर्ण माहिती द्यावी व संपूर्ण तपासणी होत नाही तोपर्यंत कोरोना बरा होईल अशी जाहिरात करू नये. असे आयुष मंत्रालया ने सांगितले आहे
मंगळवारी रामदेवबाबा आणि आचार्य बाळकृष्ण यांनी पत्रकार परिषद बोलावून कोरोणा वर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे. व या परिषद सभेत पोरवल औषधाच्या चाचणीत सहभागी असलेले वैज्ञानिक, डॉक्टर, संशोधक सुद्धा उपस्थित होते.
इथे हि वाचा
कंगना राणावत-मुंबईत माझे एक घर व ऑफिसही आहे परंतु माझा एक्स अजूनही वडिलांच्या घरात राहतो.
पुण्याची कोरोणा ची स्थिती….नवीन कोरोना रुग्णांपेक्षा डिस्चार्ज दिलेल्या रुग्णांची संख्या जास्त…