कोरोनाचे संकट गेल्यानंतर तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय गप्प बसणार नाही

मुंबई | मुंबई महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांना थेट फोडून काढण्याचा इशारा मनसेचे नेते आणि प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. मुंबईसमोर कोरोनासारखं मोठं संकट उभं असतानाच महापालिकेचे काही अधिकारी आपले खिसे भरत असल्याचा आरोप देशपांडे यांनी केला आहे.

सध्या महानगरपालिकेतील भ्रष्ट अधिकारी आपत्कालीन परिस्थितीच्या नावाखाली स्वतःच्या तुमड्या भरून घेत आहेत. त्यांना एकच इशारा आहे तुमच्यावर आमची करडी नजर आहे, असं संदिप देशपांडे यांनी सांगितलं आहे. त्यांनी या संदर्भात एक ट्विट केलं आहे.

कोरोनाचं संकट गेलं की तुम्हाला रस्त्यावर फोडून काढल्याशिवाय हा महाराष्ट्र सैनिक गप्प बसणार नाही, असं देशपांडे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच देशपांडे यांनी शहरातील रुग्णालयांच्या परिस्थितीबद्दल चिंता व्यक्त केली होती. रुग्णालयामध्ये बेड मिळत नसल्याने मुंबईकरांचे हाल होत आहेत हे सांगताना देशपांडे भावूक झाले होते

इथे हि वाचा

सरकार नमुन्यांची कमी संख्या तपासून प्रकरणांची संख्या कमी ठेवण्याचा प्रयत्न करीत आहे: देवेंद्र फडणवीस, भाजपा

गरोदर पत्नीसाठी त्याने काढला तब्बल 8 वेळा epass आणि तोही रद्द झाला .

नाशीकमध्ये नदीच्या पुरात वाहून जाणाऱ्या तरुणाला वाचवण्यात यश –

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: