“सत्तेत येण्यासाठी मोदींनी खोटी प्रतिमा तयार केली पण ती आता भारताची सर्वात मोठी दुर्बलता

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाने हाहाकार घातला असताना च चीन ने भारतावर घुसखोरी केली व यात काही भारतीय जवान शहीद ही झालेले आहेत.यालाच प्रत्युत्तर भारतीय जवानांनी सुद्धा चीनच्या 20 पेक्षा अधिक सैनिकांचा खात्मा केला होता व यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली होती. परंतु भारताच्या आजूबाजू च्या देशांनी भारताला पाठिंबा दिल्यामुळे चीनने कोणतीही हालचाल केली नाही .अशातच आता भारत-चीन या वादावरून काँग्रेसचे ते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जहरी टीका केली. 

राहुल गांधींनी ट्विट करत नरेंद्र मोदींवर जाहीर टीका केली आहे.मोदींनी सत्तेत येण्यासाठी स्वतःची बलवान असल्याची खोटी प्रतिमा तयार केली होती परंतु हीच प्रतिमा आता भारतासाठी मोठी दुर्बलता झालेली आहे.असं राहुल गांधी यांनी ट्विट करत मोदींवर टीका केली आहे.

त्याचबरोबर भारत आणि चीन हा काही सीमावाद नाही .चीन भारताच्या हद्दीत येऊन बसलेला आहे ही माझ्यासाठी चिंतेची बाब आहे. चीन कोणत्याही रणनीती शिवाय पाऊल उचलत नाही. ते त्यांना हवं तसं करतात, त्यामुळे आपल्याला आधी त्यांची रणनीती समजून घेणे महत्त्वाचे आहे म्हणत राहील गांधींनी ट्विट केले.

चीन आपले महामार्ग रोखण्याचा प्रयत्न करत आहे. चीन पाकिस्तान सोबत मिळून काहीही मोठं करू शकतो हा सीमावाद नसून पूर्वनियोजित सीमावाद आहे. ते मोदींवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्यामुळे मोदींना आपल्या प्रतिमेला कायम ठेवावे लागणार असल्याचं राहुल गाधींनी व्हिडीओमध्ये सांगितलं आहे

इथे ही वाचा

चिंता वाढली, महाराष्ट्राचा मृत्यूदर देशात सर्वाधिक!

कचराकुंडीजवळ सापडला रक्तानं माखलेला भलामोठा दगड; समोर आला धक्कादायक प्रकार

शिक्षकानं स्वतःचं चित्र काढून त्यावर टाकली मृत्यूची तारीख; त्यानंतर जे घडलं ते ऐकून धक्का बसेल!

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: