पुणे | पुणे जिल्ह्यात सध्या वीजबिलांची थकबाकी 1081 कोटींवर पोहोचली आहे. ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचा निर्णय महावितरणने घेतला आहे.
पुणे जिल्ह्यात वीजबिलाची थकबाकी सामान्यत: 70 कोटींपर्यंत होती. मात्र कोरोनाकाळात थकलेल्या विजबिलामध्ये ही थकबाकी तब्बल 1081 कोटीपर्यंत पोहोचली आहे.
वीजबिलाची थकबाकी असल्यामुळे त्याची आर्थिक झळ महावितरणला सोसावी लागत आहे. आता सरकारने थकित विजबिलाच्या बाबतीत कडक पवित्रा धारण केल्याचं दिसत आहे.
थकबाकीदारांना नोटीस पाठवून वीजबिल भरण्यास सांगितलं जाईल. तरीदेखील ग्राहकांनी प्रतिसाद न दिल्यास वीजपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरु करण्यात येणार असल्याची माहिती आहे.