नागपूर :- लॉकडाऊन घोषित झाल्यापासून ऍटोरिक्षा चालक संकटात आले आहेत. ऑटोचालकांनी आर्थीक मदत मिळावी या हेतूने वारंवार मागण्या केल्या आहेत. लोक प्रतिनिधींना वेळोवेळी निवेदनसुद्धा दिली आहेत. मात्र, सरकार या विषयावर गप्प आहे. तर या झोपलेल्या राज्यसरकार ला जाग यावी म्हणून काल महाराष्ट्रा मध्ये वेगवेगळ्या ठिकाणी राजे ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली हॉर्न वाजवा आंदोलन केले होते.
कोरोनाच्या या महामारीत सर्वांचेच आर्थिक नुकसान झाले आहेत.लॉकडाऊन घोषित झाल्या पाहिजे रिक्षा चालतांना मोठ्या प्रमाणत आर्थिक झळ बसली आहेत.
या पार्श्वभूमीवर विदर्भातील नोंदणीकृत ऍटोरिक्षा चालकांना शासनाने दरमहा 5 हजार रुपये आर्थिक मदत करावी, या विनंतीसह विदर्भ ऍटोरिक्षा चालक फेडरेशनने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. यावर, शासनाला 26 जूनपर्यंत धोरण स्पष्ट करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.
इथे हि वाचा
अडचणीच्या काळात शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी
नाभिक समाजावर अन्याय नको, त्यांनाही दुकाने उघडण्याची परवानगी द्या – प्रकाश आंबेडकर
विश्वासात घेतले जात नसेल तर काँग्रेस ने महाविकास आघाडी सरकार चा पाठिंबा काढावा -मा. रामदास आठवले