१२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर निर्घृणपणे बलात्कार; वंचित बहुजन आघाडी आक्रमक.

राज्याच “गृहखात” सांभाळणार्‍या “देशमुख” यांच विधानसभा क्षेत्र बनलयं गुन्हेगारीच केंद्रबिंदु !

१२ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर निर्घृणपणे बलात्कार; वंचित बहुजन आघाडी आक्रमक.

नागपूर – नरखेड तालुक्यातील बेलोना या गावामध्ये १२ वर्षाच्या चिमुकल्या मुलीवर अमानुषपणे बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी घटनास्थळी पोहोचून कुटुंबिय व पीडित मुलीची भेट घेऊन तिला मानसिक आधार देण्यात आला, व आरोपींना फाशीच्या शिक्षेपर्यंत पोहोचविण्याच्या लढाईत सोबत असल्याचे आश्वासित केले. सोबत स्थानिक पोलिस स्टेशन व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन प्रकरणाबाबत अधिक माहिती घेतली.

गेल्या सहा महिन्यांत गृहमंत्री यांच्या विधानसभा क्षेत्रात अनेक गुन्हे उघडकीस आले. त्यात महाराष्ट्रभर गाजलेले अरविंद बन्सोड मृत्यु प्रकरण. ज्याचे प्रतिसाद राज्याबाहेर सुद्धा उमटले.
जे आमदार स्वतःच्या मतदारसंघातील महिला, युवक, वृद्ध, दलित, आदिवासी यांना योग्य सुरक्षा प्रदान करू शकत नाही ते संपूर्ण महाराष्ट्राची जवाबदारी कशी सांभाळणार असा खोचक सवाल वंचित बहुजन आघाडीच्यावतीने करण्यात आला.

बलात्कार प्रकरणाची गंभीर दखल घेऊन देशमुख यांनी सर्वस्वी जवाबदारी स्विकारुन गृहमंत्री पदाचा त्वरित राजीनामा द्यावा. अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन सुरू ठेवणार. अशी भूमिका जिल्हा प्रवक्ते सुमेध गोंडाने यांनी मांडली.

त्यावेळी वंचित बहुजन आघाडी नागपुर शहर अध्यक्ष रविबाबू शेंडे, महासचिव धर्मेश फुसाटे, महासचिव राहुल दहीकर, जिल्हा प्रवक्ते सुमेध गोंडाने, विकीबाबा पाटील, अॅड. स्वाती मसराम, शुभम गोंडाने, सिद्धांत पाटील, प्रफुल्ल सोमकुंवर व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Posts

%d bloggers like this: