शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे उमेदवार करोडपती; जाणून घ्या गाड्या, ठेवी, दागिने आणि जमिनींचा तपशील

0
20

सातारा | राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे उमेदवार शशिकांत शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यांनी दाखल केलेल्या अर्जातील प्रतिज्ञापत्रात ते करोडपती असल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या नावावर एकही गाडी नसून पत्नी वैशाली शिंदे यांच्याकडे मात्र टोयोटा फॉर्च्युनर व टोयोटा इनोव्हा अशा दोन गाड्या आहेत.

रोख रक्कम, मुदत ठेवी, शेअर्स, गुंतवणूक किती?

शशिकांत शिंदे यांच्याकडे १० हजार रूपयांची, पत्नी वैशाली यांच्याकडे ७ हजार रूपये तर विभक्त कुटुंब म्हणून २५ हजार पाचशे रूपयांची तर मुलगा साहिल याच्याकडे २० हजार ५०० रूपयांची रोकड आहे. विविध बॅंकांमध्ये शिंदे यांची २ लाख ९१ हजारांची मुदत ठेव, पत्नीच्या नावे ५ लाख ३२ हजार रुपयांची तर अविभक्त कुटुंब म्हणून २२ लाख ७१ हजार ६६९ रूपयांच्या मुदत ठेवी आहेत.

वाशी येथील विविध बॅंकांत ३१ लाख ६७ हजार ९८० रूपये तर पत्नी वैशालीच्या नावे विविध बॅंकांत ३८ लाख २४ हजार ४२१ रूपये आहेत. बंदपत्रे व शेअर्स अशी १२ लाखांची गुंतवणूक असून एलआयसीच्या २० लाखांवर पॉलिसी आहेत.

पत्नीच्या नावे ६७ लाख रुपयांची गुंतवणूक आहे. तसेच पत्नीच्या नावे ९ लाख रूपयांचे ३७५ ग्रॅम जडजवाहिर आहेत. शशिकांत शिंदेंच्या नावे १ कोटी ७४ लाखांची तर पत्नीच्या नावे ६ कोटी २४ लाख, विभक्त कुटुंब म्हणून ४४ लाख ८९ हजारांची तर मुलगा साहिलच्या नावे २३ लाख ६० हजारांची जंगम मालमत्ता आहे.

शेतजमीन, स्थावर मालमत्ता किती?

शशिकांत शिंदे यांच्या नावावर ११ लाख ७१ हजार रुपयांची शेतजमीन तर पत्नी वैशालीच्या नावे १ कोटी ४२ लाख ९८ हजार रूपयांची जमीन आहे. शिंदे यांच्या नावे २ एकर २ आर क्षेत्राची १ कोटी ५७ लाखांची तर पत्नी वैशालीच्या नावे १८ एकर तर मुलगा साहिलच्या नावे २ एकर ६ आर बिगरशेती जमीन आहे.

इथे हि वाचा

मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी उपनगरीय रेल्वेसेवा सुरु करावी – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हुमगाव, ल्हासुर्णे व वाशी मुंबई येथे निवासी इमारती आहेत. असे एकुण शशिकांत शिंदेंच्या नावावर स्थावर मालमत्ता ९ कोटी २५ लाख, ८९ हजारांची तर पत्नी वैशालीच्या नावे २१ कोटी ४५ लाख, ५२ हजारांची तर मुलगा साहिलच्या नावे ५० लाखांची स्थावर मालमत्ता आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here