…म्हणून पंतप्रधान मोदींना राष्ट्रवादी युवक काँग्रेसकडून ‘चिनी खुळखुळे’ भेट

0
5

बीड | चीनने केलेल्या हल्ल्यात भारताचे 20 जवान शहीद झाले तरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कारवाई केली नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबुब शेख यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ‘चिनी खुळखुळे’ भेट पाठवून राष्ट्रवादी युवक काँग्रेसने तीव्र निषेध व्यक्त केला आहे.

चीन सातत्याने भारतावर हल्ले करत आहे. त्यामध्ये आपले जवान शहीद होत आहेत परंतु केंद्र सरकार यावर ठोस पावले उचलताना दिसत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी नेहमी लहानसहान गोष्टीवर ट्वीट करत असतात मात्र चीनच्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांसाठी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही, अशी टीका मेहबूब शेख यांनी केली.

भारताचे 20 जवान शहीद झाल्यानंतर देखील मोदींनी यासंदर्भात ठोस पावलेही उचललेली नाही, असा आरोप करत आता मोदींनी चीनला ‘लाल डोळे’ दाखवायची वेळ आली आहे. तुम्ही त्यांना ‘लाल डोळे’ दाखवा पुर्ण देश तुमच्या सोबत आहे, असं शेख म्हणाले.
दरम्यान, चीनच्या हल्ल्यानंतर कोणतीच भूमिका न घेणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चीनच्या वस्तूमधील ‘खुळखुळा’ राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने भेट म्हणुन पाठवून केंद्र सरकारचा निषेध करण्यात आला आहे.

इथे हि वाचा

महाराष्ट्रात दररोज १६ ते १७ परप्रांतीय मजुरांचे आगमन.

या ठिकाणी सॅनिटरी नॅपकिन्स प्रतिपॅड 1 रूपये दराने उपलब्ध, सरकारचा मोठा निर्णय

दिल्लीत आता रैपिड ऐंटिजेन टेस्टिंग चा अहवाल फक्त 15 मिनिटांत मिळणार :- केजरीवाल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here