मुंबई | भाजप आमदार नितेश राणे यांनी पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरून आणि त्यामुळे महाविकास आघाडीत दिसून आलेल्या अमन्वयावरून जोरदार टीका केली आहे. त्यांनी हे सरकार नाही तर सर्कस आहे अशा शब्दात बोलत त्यांनी ठाकरे सरकारला लक्ष्य केलं आहे.
नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय?? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते??मात्र कांग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई?? हे खरच सरकार नाही CIRCUS आहे!!, अशी टीका करत त्यांनी ट्विटरवर ट्विट केले.
2 जुलै रोजी मुंबईमधल्या 10 पोलिस उपायुक्तांच्या बदल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना न सांगता तडकाफडकी रद्द करण्यात आल्या होत्या. या बदल्या मुख्यमंत्र्यांच्या आदेशावरून रद्द केल्या अस म्हटले जात आहे.
मुंबईचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी रविवारी सुट्टी असताना बदली रद्द करण्याचे आदेश दिले. त्यात त्यांनी नवीन ठिकाणचा पदभार सोडावा आणि पूर्वीच्या ठिकाणी रुजू व्हावेअसे दहा पोलीस आयुक्तांना सांगण्यात आले होते असे स्पष्ट झालेले आहे .