कोरोनामुळे नव्हे तर ‘या’ विचित्र आजाराने अमेरिका झालीय हैराण!

वाॅशिंग्टन डी.सी | अमेरिकेत कोरोना बाधितांचे आकडा दिवसेंदिवस वाढत असून कारोणा चा प्रादुर्भाव कमी होण्या आधीच एका नवीन आजाराने अमेरिकेत शिरकाव केलेला आहे .तब्बल 11 राज्‍यांमध्‍ये सायक्सोस्पोरा या आजाराचे रुग्ण अमेरीकेत आढळून आलेले आहे.

अमेरिकेत या आजाराने आजतागायत तब्बल ६४० लोकांना विळखा घातला असून रूग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढत होत आहे. पॅकेट्समध्ये विकल्या जाणाऱ्या सॅलेड्समुळे हा ‘सायक्सोस्पोरा’ नावाच्या गंभीर आजाराचा प्रादुर्भाव पॅकेट्स मध्ये विकल्या जाणाऱ्या सलेडस मुळे वाढत असल्याचे सांगण्यात आलेले आहे.

गाजर कोबी यांसारख्या भाज्यांचे सॅलेड्स या पॅकेटमध्ये पॅक असतात . 37 जणांना सायक्सोस्पोरा या आजाराची लागण झालेली असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.

भूक न लागणे, मळमळ, सौम्य ताप, थकवा, पोट फुगणे इ. यांसारखी लक्षणे या आजारांमध्ये आढळून येत आहेत व तसेच पॅकेट्स मधील अन्न आणि पाणी प्यायलायास या आजाराचा धोका काही आठवड्याच्या कालावधी नंतर दिसण्यास सुरुवात होते.

इथे ही वाचा

बॉलिवूडमध्ये माझ्याविरोधात गँग काम करतेय’ संगीतकार ए आर रहमानचा धक्कादायक खुलासा!

भाजपाच्या ग्रामपंचायत सदस्याचा वंचित बहुजन आघाडीत प्रवेश

कॅप्टनने एकाच ठिकाणी बसून सगळ्या टीमवर लक्ष द्यावं- शरद पवार

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: