डायटच्या ऑनलाईन शिक्षणात रमले विद्यार्थी

0
9

महासंवाद
डायटच्या ऑनलाईन शिक्षणात रमले विद्यार्थी
Team DGIPR by Team DGIPR May 6, 2020 2 min read
डायटच्या ऑनलाईन शिक्षणात रमले विद्यार्थी
• अडीच लाख विद्यार्थ्यांनी नोंदविला सहभाग
• मोटू-पतलू, छोटा भीम, डोरेमनमुळे संकेतस्थळ झाले आकर्षक
• तज्ज्ञ मार्गदर्शकांनी केली साहित्याची निर्मिती
वर्धा, दि 6 मे (जिमाका) : कोरोना संसर्गामुळे सर्वत्र लॉकडाऊन असल्याने शिक्षण क्षेत्रही प्रभावित झाले आहे. लॉकडाऊनच्या काळात सर्व शाळा बंद आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था( डायट) व जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या वतीने 10 एप्रिल पासून जिल्ह्यात ऑनलाईन गृह शिक्षण (Learn From Home) उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला जिल्ह्यात चांगला प्रतिसाद मिळत असून आतापर्यंत २ लाख ५३ हजार १४२ विद्यार्थ्यांनी ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवून ‘लर्न फ्रॉम होम’ उपक्रमात सहभाग नोंदविला आहे.

Maha Info Corona Website
राज्यभरातील शाळा आता नवीन आदेशानुसार 17 मे पर्यंत बंद राहणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या अध्ययनातील सातत्य कायम राहावे, यासाठी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी लर्न फ्रॉम होम ही संकल्पना मांडली. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या माध्यमातून ऑनलाईन अभ्यासक्रमाचा हा उपक्रम संपूर्ण राज्यभर सुरु झाला आहे.

जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट) ही गुणवत्तेसाठी काम करणारी वर्धा जिल्ह्यातील शिखर संस्था आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओंबासे यांच्या मार्गदर्शनाखाली डायटने लर्न फ्रॉम होमसाठी विद्यार्थ्यांना घरबसल्या सोडविण्यासाठी आवश्यक अभ्यास साहित्य संस्थेच्या वतीने www.dietwardha.com या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिले आहे. जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्य यांनी शिक्षणाधिकारी प्राथमिक व माध्यमिक यांच्या समन्वयाने जिल्हा स्तरावर विषय साधन व्यक्ती व शिक्षकांचा विशेष कृती गट स्थापन केला. या कृती गटाच्या मदतीने लर्न फ्रॉम होम अंतर्गत जिल्हयातील विद्यार्थ्यांसाठी तयार केलेले अभ्यास साहित्य संकेत स्थळावर उपलब्ध करुन दिले. जिल्हयातील आठही तालुक्यातील सर्व माध्यमांच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळातही जिल्हयातील विद्यार्थ्यांचे अध्ययन सुरु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here