बीड | आज गुरुपौर्णिमा… भारतात गुरुपौर्णि मेला खूप महत्त्व दिले जाते. आपल्या भारतीय संस्कृतीत आई वडिलांनंतर गुरूंना नेहमीच विशेष स्थान देण्यात आलेले आहे.त्यांच्याकडून आपण नेहमी विद्या घेत असतो अशा गुरूंची पूजा करणे हे या दिवशी अपेक्षित असते अशातच गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सुद्धा त्यांच्या गुरूंचे स्मरण केले आहे.
गोपीनाथ मुंडे म्हणजेच पंकजा मुंडे यांचे वडील हेच त्यांचे गुरु. यांचे बोट धरून त्या राजकारणात आल्या. आज त्यांना त्यांची उणीव भासते आहे. पंकजा मुंडे यांनी ट्विट करत आज गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने गोपीनाथ मुंडे यांची आठवण जागवली आहे.
मला माझ्या गुरु नसल्याचे कमी नेहमीच राहील. गुरूंच्या मार्गदर्शनाशिवाय वाटचाल करणे अत्यंत अवघड असते .परंतु माझे गुरु विचारांनी नेहमीच पाठीशी आहेत. “थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही”. असे नेहमीच मला माझ्या गुरुंनी शिकवलेले व मी तसे वागण्याचा प्रयत्न करत राहील. असं त्या ट्विटमध्ये म्हणाल्या आहेत.
भाजपची राज्य कार्यकारणी जाहीर झाल्यामुळे या मधून पंकजा मुंडे यांचे नाव वगळण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. व त्यांच्या जागी त्यांच्या भगिनी खासदार प्रीतम मुंडे यांना स्थान देण्यात आली येणार आहे. त्यामुळे त्यांनी दिलेला मेसेज मेसेज सूचक मानल्या जाणा-या म्हटलं जात थकणार नाही, रुकणार नाही, कोणासमोर कधीही झुकणार नाही, असा मेसेज देत पंकजा मुंडे यांनी ट्विट केले .
इथे ही वाचा
अजित पवार – भविष्यातील गरजा लक्षात घ्या…
परेश रावल-देवा..! आम्हाला नरेंद्र मोदी दिल्याबद्दल तुमचे आभार….
भ्रष्टाचार करणाऱ्या महासंचालकाला भाजप, महाआघाडी सरकारचे अभय – राजेंद्र पातोडे