पालकहो, आता तुम्हीच सांगा शाळा कधी उघडायच्या?; सरकार मागत आहे तुमचा फीडबॅक

0
5

नवी दिल्ली |कोरोणा चा संसर्ग दिवसेंदिवस वाढतच चालला आहे प्रशासन दक्षतेकडून लॉक डाऊन करण्यात येत आहेमात्र कोरोना चा संसर्ग दिवसेंदिवस वाढत चालल्यामुळे प्रशासनाला लॉकडाऊनचा कालावधी वाढवावा लागत आहे पण यामध्ये विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

ऑगस्टमध्ये शाळा चालू करण्यात येणार असून शाळांकडून सांगण्यात आलेलं होतं पण कोरोणा चा वाढता संसर्ग पाहता पालकांकडून याला विरोध करण्यात आलेला होता. यामुळे मानव संसाधन विकास मंत्रालयाच्या भाग असणाऱ्या शालेय शिक्षण विभागाने तसेच केंद्रशासित प्रदेशांने पत्र पाठवलं व पालकांकडून शाळा कधी सुरू करायला हव्यात याबद्दलची मत मागविण्यास सांगितलेलं आहे याबाबतचे इंडियन एक्सप्रेस वृत्त दिलेले आहे.

मंत्रालयाकडून सर्व राज्यांच्या शिक्षण सचिव यांना पाठवण्यात आलेल्या पत्रांमध्ये हे विनंती करण्यात आली आहे की,शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून 20 तारखेपर्यंत मतं नोंदवावी. शाळा कधी सुरू करायला पाहिजे असा पहिला प्रश्न शाळा ऑगस्ट ,सप्टेंबर की ऑक्टोबर महिन्यात चालू करायच्या व दुसरा प्रश्न शाळा सुरू झाल्यावर पालकांच्या काय अपेक्षा असतील.

दरम्यान, एकीकडे अधिकाऱ्याने राज्यांना पत्र पाठवल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असताना दुसरीकडे शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती जाहीर केलेली नाही. अभिप्राय देण्यासाठी सोमवारची डेडलाइन असताना अद्यापही बहुतेक शाळांना याबद्दलची कोणतीही माहिती नाही असं समजलं आहे.गृहमंत्र्यांकडून 29 जून रोजी जाहीर करण्यात आलेलं होतं लॉक डाऊन 2 च्या गाईडलाईन्स नुसार शाळा-कॉलेज, शैक्षणिक संस्था 31 जुलै बंद राहणार.

इथे ही वाचा

“सत्तेत येण्यासाठी मोदींनी खोटी प्रतिमा तयार केली पण ती आता भारताची सर्वात मोठी दुर्बलता

चिंता वाढली, महाराष्ट्राचा मृत्यूदर देशात सर्वाधिक!

“सत्तेत येण्यासाठी मोदींनी खोटी प्रतिमा तयार केली पण ती आता भारताची सर्वात मोठी दुर्बलता

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here