शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी महाराष्ट्रात दलित-बौद्ध-आदिवासी-महिला यांच्या वर मोठ्या प्रमाणावर अन्याय-अत्याचार वाढले असून सर्रासपणे जातीयवादी, धर्मांध शक्ति जातीयद्वैशातून बौद्ध-दलित तरुणांचे खून करीत आहेत, उदा,अरविंद बनसोडे, विराट जगताप ,भिमराज गायकवाड, या बौद्ध तरुणांच्या खून होत आहे ,हा प्रकार पुरोगामी महाराष्ट्राला मानवतेला काळिमा फासण्या सारखा आहे सदर घटनेचा अत्याचार विरोधी कृती समितीच्या व
भिमशक्ती संघटनेच्या वतीने जाहीर निषेधाचे निवेदन मा नायब तहसीलदार साहेब ता नांदगाव यांना देण्यात आले ,सदर निवेदनात दोषी आरोपी यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी व महाराष्ट्रातील बौद्ध-दलित-आदिवासी यांच्या वर होणारे अन्याय-अत्याचार त्वरित थांबले नाहीत तर लोकशाही मार्गाने आंदोलने अत्याचार विरोधी कृती समितीच्या व भिमशक्ती संघटनेच्या वतीने करण्यात येतील असा इशारा देण्यात आला, यावेळी मा मनोजभाई चोपडे (avsk ता निमंत्रक व भिमशक्ती जिल्हानेते )दिपकभाई अंभोरे (सामाजिक कार्यकर्ते)सोनुभाई पेवाल भिमशक्ती रोहन गायकवाड आदि उपस्थित निवेदन देण्यात आले