पिंपरी चिंचवड- येथील पी एस आय ला पैशांची लाच घेताना अटक…

0
6

पिंपरी चिंचवड| पिंपरी चिंचवड येथील पोलिस उपनिरीक्षक फारूक सोलापुरे यांना आज पाच लाखांची लाच घेताना रंगेहात पकडले . लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून ही कारवाई करण्यात आलेली आहे.फारूक सोलापुरे पिंपरी चिंचवड उपनिरीक्षक पदावर होते.

आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या चिखली पोलिस ठाण्यात ते कार्य करत होते आता सोलापुरे यांना साने पोलीस चौकीत नेमणूक देण्यात आली होती.चिखली पोलीस ठाण्यात 29 तारखेला तक्रार आली होती की तक्रारदारांनी बांधकाम केलेल्या बिल्डींगमधील सहा फ्लॅट विकले होते. ते फ्लॅट विकत घेतलेल्या लोकांकडून काही पैसे येणे बाकी होते.

तक्रारदारांनी पैसे मिळावेत म्हणून चिखली पोलीस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारी बद्दल चौकशीचं काम सोलापुरे यांच्याकडे होतं. सोलापूरे यांनी पुढील कारवाई करण्यासाठी पाच लाख रुपयांची लाच मागितली. तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधला व हकीकत सांगितली. त्यानुसार योजना करून तसेच सापळा रचून एसीबीने ही कारवाई केली आहे.व सोलापूर यांना लाच घेताना रंगेहात पकडले आहे.

इथे हि वाचा

राहुल गांधी म्हणाले,नरेंद्र मोदी हे खरं तर ‘सरेंडर’ मोदी आहेत

चिंताजनक बातमी… पुणे जिल्ह्यात एकच दिवसात कोरोना बाधितांची संख्या 823

24 तासात सापडले आतापर्यंतचे सर्वात जास्त रुग्ण ,देशभरात कोरोणा बाधित रुग्णांचा आकडा 4 लाखापेक्षा जास्त…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here