पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करणार; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मुंबई | ठाकरे सरकारने पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करण्याचा निर्णय घेतलाय. या मालमत्तेचा लिलाव करुन पैसे वसूल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती मंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे.

रविंद्र वायकर यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात पीएमसी बँक घोटाळ्यातील आरोपींची मालमत्ता जप्त करुन खातेदारांची रक्कम अदा करावी, अशी मागणी केली होती. यावर राज्य सरकारने मालमत्ता जप्त करुन लिलाव करण्याचा निर्णय घेतल्याचं पत्र गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी तक्रारदारांना लेखी पत्राद्वारे दिलं.

पीएमसी बँकेने बनावट कागदपत्रं बनवली आहेत. यासोबतच एचडीआयएल कंपनीने ज्या खात्यांवर कर्ज घेतलं आहे त्यांची कागदपत्रं देखील तपासली जाणार आहेत. या कागदपत्रांच्या तपासणीसाठी बँक अधिकारी आणि कर्मचारी यांचेही जबाब नोंदवण्यात येतील, असं या पत्रात लिहिलं आहे.

या प्रकरणातील आरोपींची भारतात आणि भारताबाहेर आणखी काही संपत्ती आहे का याबाबतही सखोल तपास केला जाणार आहे, असंही सतेज पाटील यांनी पत्रात म्हटलंय.

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: