पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे :- गृहमंत्री अनिल देशमुख

0
3

पोलिसांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे..

नवी मुंबई, दि. ११ सध्याच्या लॉकडाऊन काळात नवी मुंबईतील पोलीस बांधव अत्यंत मेहनतीने आपले कर्तव्य बजावत आहेत, याचा मला अभिमान आहे. कोरोना विरुद्धचे युद्ध जिंकण्यासाठी त्यांनी आरोग्याची काळजी घेत कर्तव्य बजावावे असे भावनिक आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी काल नवी मुंबई येथे केले नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त संजीव कुमार, सह पोलीस आयुक्त राजकुमार व्हटकर, उपायुक्त सर्वश्री सुरेश मेंगडे शिवराज पाटील, अशोक दुधे, प्रवीण पाटील,पंकज डहाणे आदी अधिकारी उपस्थित होते.

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कोविड संदर्भातील होत असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. पोलिस व त्यांच्या कुटुंबियांच्या आरोग्याची अधिक काळजी घेण्याबाबत आयुक्तांना सूचना केली. तसेच पोलीस आयुक्तालयासाठी आधुनिक ड्रोन सुविधा आवश्यक सामग्री घ्यावी अशाही सूचना मंत्री श्री. देशमुख यांनी यावेळी केल्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here