लोकप्रिय तुकाराम मुंढेंविरोधात नागपूरच्या या पोलिस ठाण्यात तक्रार दाखल

0
5

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूर मधील काही विभाग कोरोना चे हॉसस्पॉट बनत चालले होते त्यावर नियंत्रण आणण्याचे काम तेथील प्रशासनाने केले आहे. तुकाराम मुंढे यांची काम करण्याची शैली बघून जनता नेहमी खूश असते तर प्रतिनिधी त्यांच्या विरोधात असतात या बदल आपण नेहमी बघितले आहे.

आपल्याला आणि दुसऱ्याला कोरोनापासून वाचायचे असेल तर सोशल डिस्टनसिंग पाळण्याचे आवाहन नागपूर महापालिकेचे आयुक्‍त तुकाराम मुंढे वारंवार करीत राहतात. यासाठी त्यांनी अनेकदा कठोर निर्णय देखील घेतले. यामुळे त्याच्यावर अनेकांनी रोषही व्यक्‍त केला. मात्र, त्यांनीच सोशल डिस्टनसिंगच्या नियमांचे उल्लंघन केले. त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, यासाठी गणेशपेठ पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल करण्यात आला आहे. 

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मनपा आयुक्‍त तुकाराम मुंढे हे 31 मे 2020 रोजी गणेशपेठ परिसरातील रजवाडा पॅलेसमधील सभागृहात आयोजित दोनशे लोकांच्या कार्यक्रमात मंचावरून नागरिकांना संबोधित करताना सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओत दिसत आहेत. या कार्यक्रमात महाराष्ट्र राज्य सरकारने पारित केलेल्या नियमांचे कोणत्याही प्रकारे पालन करताना ते दिसत नसल्याचे मनीष प्रदीप मेश्राम (रा. सिरसपेठ, नागपूर) तक्रार अर्जात म्हटले आहे. त्यांनी तक्रारीसोबत व्हिडिओचा संदर्भही जोडला आहे.

आता तुकाराम मुंढे यांच्यावर कारवाई होणार का.? नेहमी कडक नियम पाळणारे आता यांच्यावर कारवाई होईल का याकडे सर्वांचे लक्ष आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here