CA परीक्षेबाबत निर्णयाची शक्यता….

Spread the love

नवी दिल्ली | कोरोना च्या पार्श्वभूमीवर सध्या सर्वच परीक्षा लांबणीवर टाकल्या गेलेल्या आहेत आता त्यातच ‘इन्सटिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊंट्स ऑफ इंडिया’ च्या वतीने नियोजित सनदी लेखापाल परिक्षा रद्द होण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे.

याबाबतचा अंतिम निर्णय सर्वोच्च न्यायालयात 10 जुलै रोजी निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळाली आहे. त्याचबरोबर सनदी लेखापालाची ही परीक्षा जुलै-ऑगस्ट महिन्यात पूर्वनियोजित करण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

ही परीक्षा पुढे ढकलण्यात यावी अशी विनंती विद्यार्थी व पालकांनी संस्थेला केली .यावरच जुलै किंवा नोव्हेंबर मधे परीक्षा घेण्यात येतीलअसे संस्थेकडून सांगण्यात आले.मात्र पालकांनी संस्थेच्या या निर्णयाला विरोध करत सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.

याबद्दलची सुनावणी अखेर गुरुवारी पार पडली. सद्य परिस्थितीचा विचार करून सध्या कोणत्याही प्रकारच्या परीक्षा घेण्याचे अवघड झाले असल्याने अंतिम निर्णय 10 जून रोजी न्यायालयात सादर केला जाईल असं संस्थेकडून सांगण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.

इथे ही वाचा

भाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”

भाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”

प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक सरोज खान यांचं निधन


Spread the love

Leave a Comment

Your email address will not be published.