नरेंद्र मोदींमुळेच कोरोना भारतात आला, त्यांच्यावर 302 चा गुन्हा दाखल करा”-डॉ प्रकाश आंबेडकर

0
423

मुंबई | परदेशातून येणाऱ्या लोकांना वेळीच क्वारंटाईन Quarantine न केल्यामुळे देशात कोरोनचा Corona प्रसार झाला. यासाठी सर्वस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीच Narendra Modi जबाबदार आहेत. त्यामुळे कोरोनामुळे मृत्यू झालेल्या लोकांच्या नातेवाईकांनी पंतप्रधान मोदींवर ३०२ चा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे संस्थापक डॉ प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

कोरोनाचा जगात प्रादुर्भाव झाल्यानंतर जानेवारीपासूनच लॉकडाऊनची Lockdown प्रक्रिया सुरू झाली. मात्र, भारतात हे करायला मार्चचा तिसरा आठवडा उजाडला. परदेशातून येणाऱ्या लोकांची योग्य तपासणी करून त्यांना १४ दिवस क्वारंटाईन केले असते तर भारतात कोरोना पसरला नसता, असं प्रकाश आंबेडकर म्हणाले आहेत.

लॉकडाऊन करण्यापूर्वी मजुरांना त्यांच्या घरी पाठवून दिले असते तर आज मजुरांवर उपासमारीची वेळ आली नसती. कोरोनामुळे सर्वांचे जनजीवन विस्कळीत झाले असून ते दुरुस्त करण्याच्या स्थितीमध्ये हे सरकार दिसत नाही. संकटावर संकट येणार असून त्याचबरोबर श्रीमंतांची श्रीमंती वाढणार आहे. गरीब आणखी गरीब होतील,असंही ते म्हणाले.

दरम्यान, ग्रामीण भागात अद्यापही कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला नाही. अशा ठिकाणीही लॉकडाऊन करण्यात आले आहे.  लोकांच्या टॅक्समधून येणारा पैसा हा ग्रामीण भागात वापरायचा असतो. प्रत्येक मजुराला काम मिळाले पाहिजे. १० हजार कोटींची गंगाजळ ही टॅक्समधून ग्रामीण भागासाठी येते. ते पैसे वापरण्यात आले पाहिजेत. जेणेकरून ग्रामीण भागातील लोकांवर उपासमारीची वेळ येणार नाही, असंही आंबेडकर यांनी सांगितलं

इथे हि वाचा

काय आहे त्या वायरल फोटो मागचे सत्य

जागतिक आरोग्य संघटनेने व्यक्त केली भिती-कदाचित कोरोना विषाणू कधीच संपणार नाही

संजय राऊत यांचा जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांना सल्ला, म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here