मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वयभूमीवर मंगळवारी रात्री 8 वाजता देशाला उद्देशून संबोधन केलं. त्यांच्या भाषणानंतर वंचितच बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका केली आहे.
पंतप्रधानांना ठोस काही सांगायचं नसेल तर देशाला गोंधळात का टाकायचं? असा प्रश्न वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला आहे. पंतप्रधानांच्या भाषणात ठोस भूमिका नव्हती, असा आरोप त्यांनी केला आहे.
पंतप्रधानांना स्वत:हून कोणती वाईट किंवा कठोर बातमी देशासमोर द्यायची नाहीय. केंद्रीय अर्थमंत्री किंवा राज्यांतील मुख्यमंत्र्यांकरवी तशा बातम्या वदवून घेतल्या जातील. कदाचित हा त्यांच्या पीआरचा भाग असावा अशी टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
मध्यम वर्गाची बाजू घेण्याच्या आणि आर्थिक दुर्बल वर्गाकडे दुर्लक्ष करण्याची भूमिका तिसऱ्या टप्प्यात दिसून आली. याचीच पुनरावृत्ती चौथ्या टप्प्यातही सुरू असल्याचं प्रकाश आंबेडकर म्हणाले.
Comments 1