अकोला | भंडारा जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागेल्या आगीत 10 बालकांना आपला जीव गमवावा लागाला आहे. याच पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरोग्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
भंडाऱ्यात घडलेल्या घटनेची नैतिक जबाबदारी स्वीकारात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राजीनामा द्यावा, असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे.
भंडाऱ्यामधील घडलेल्या घटनेत ‘वरातीमागून घोडं’ अशी गत झाली आहे. इमारतीचं बांधकाम झालं त्यानंतर इमरतीचं ऑडिट होण आवश्यक होतं मात्र होत नाही. या घटनेला आरोग्यमंत्री आणि पीडब्लूडी अधिकारी जबाबदार असल्याचं आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, महाराष्ट्राच्या जनतेने वारंवार त्याच त्या निवडून येणाऱ्या सदस्यांबाबत गंभीर विचार केला तरट महाराष्ट्राचं चित्र पालटू शकते. नाहीतर अशा घटना नेहमी घडतील, असा इशाराही प्रकाश आंबेडकरांनी दिला आहे.