*डी. जी. राजहंस मेमोरियल फाऊंडेशन चे पुरस्कार जाहीर.*
भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रांमध्ये कार्यरत असणाऱ्या आणि आपल्या भरीव योगदान सामाजिक उन्नतीसाठी देणाऱ्या मान्यवरांना दरवर्षीप्रमाणे डी. जी. राजहंस मेमोरियल फाउंडेशन च्या वतीने देण्यात येणाऱ्या विशेष सन्मान पुरस्कारांची घोषणा करताना आम्हाला विशेष आनंद होतो आहे.
पुरस्कारांचे यंदाचे तिसरे वर्ष असून स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र असे या पुरस्कारांचे स्वरूप आहे.
यापूर्वी डॉ. गेल ओमव्हेट, बाबासाहेब माने सरकार आधी मान्यवरांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी यापूर्वी डॉ श्रीमंत कोकाटे, डॉ. भारत पाटणकर यांनी विशेष सन्माननीय उपस्थिती लावली होती.
तर सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये शाहीर शीतल साठे, दयानंद मेहतर आदी मान्यवर प्रबोधक यांनी हजेरी लावली होती.
सन 2020 साठीचे डी जी राजहंस मेमोरियल फाऊंडेशनचे पुरस्कार आणि सन्मान मूर्ती पुढील प्रमाणे;
डी जी राजहंस मेमोरियल फाऊंडेशन जीवन गौरव पुरस्कार – डॉ. आबासाहेब चंदर कसबेकर, कोल्हापूर (प्रतिथयश वैद्यक तज्ञ)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट पत्रकारिता सन्मान – मा. जीतरत्न पटाईत ( प्रबुद्ध भारत वृत्तपत्र )
भदंत चंद्रमणी महास्थविर धम्म दर्पण पुरस्कार – प्रवीण जामनिक, अकोला, प्रबुद्ध टी.व्ही. युट्यूब चॅनल, (धम्म विषयक जनजागृती)
क्रांतीज्योती सावित्रीमाई विशेष सन्मान पुरस्कार – सत्यभामा सौदरमल, ( महिला आणि दारूबंदी क्षेत्रात विशेष योगदान )
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले विशेष संशोधन पुरस्कार – प्रा. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर, ( विद्यापीठे क्षेत्रात विशेष संशोधन )
डी. जी. राजहंस उत्कृष्ट प्रबोधक पुरस्कार – संग्राम सावंत, कोल्हापूर ( असंघटित कामगार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य )
डी जी राजहंस उत्कृष्ट कवी पुरस्कार – कवी अरुण सूनगार “सूर्य”, ( गझल ह्या प्रकारात विशेष प्रावीण्य )
प्रबोधनकार ठाकरे विशेष उल्लेखनीय लेखक सन्मान – डॉ. आनंद गुरव, ” राजगुरू” , (साहित्य क्षेत्रात विशेष योगदान )
संत गाडगे बाबा विशेष सन्मान पुरस्कार – अक्षय सुजाता ठाकरे, जळगाव ( युवा समुपदेशक)
डी. जी. राजहंस सांस्कृतिक सन्मान पुरस्कार – अभिजित रोकडे, हातकणंगले ( यूट्यूब स्टार, अभिनेता)
डी. जी. राजहंस सर्वोत्कृष्ट संघटन सन्मान – ब्राईट आर्मी, (युवा वर्गाचे उत्कृष्ठ संघटन )
डी. जी. राजहंस उत्कृष्ट उद्योजक – शक्ती कश्यप, एस. के. ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज
सर्व सन्मान मूर्तींचे हार्दिक अभिनंदन आणि अनेकोत्तम मंगल कामना.
विशेष टीप – covid-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, प्रशासनाच्या सूचना पाळून सर्वांचे पुरस्कार वितरण दरवर्षीप्रमाणे न होता, केवळ प्रातिनिधिक स्वरूपात प्रत्यक्ष भेटून सन्मान करण्यात येणार आहे.