पंतप्रधान मोदी म्हणाले , जगाने कोरोणामुळे योगाला पूर्वीपेक्षा अधिक गांभीर्याने घेतले आहे.

0
3

कोरोना विषाणूच्या महामारीच्या संकटात जगाने योगाला अधिक गांभीर्यानं घेतले आहे. नरेंद्र मोदी यांनी आवाहन दिले की, योगामुळे आपलं मानसिक व शारीरिक आरोग्य अधिक सुदृढ व आरोग्य दायी बनतं असते. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने व्यायमाबरोबरच योगालाही आपल्या आयुष्याचं भाग बनवावं.

कौटुंबिक बंध वाढवण्याचा हा दिवस आहे. सगळे कुटुंबासोबत योग करतात. योगाच्या माध्यमातून सगळे आपल्या कुटुंबासोबत एकत्र येतात. तेव्हा संपूर्ण घरात ऊर्जेचा संचार होतो. योगाची अनेक आसने आहेत. ज्यामुळे आपल्या शरीराची शारीरिक व मानसिक शक्ती वाढते. असे नरेंद्र मोदी म्हणाले.
योगामुळे श्वसन संस्था अधिक सक्षम करण्यासाठी योगाची मोठी मदत होते. कारण कोरोना विषाणू आपल्या श्वसन संस्थेवरच हल्ला करतो.
त्याच बरोबर मोदी म्हणाले, प्राणायमाचे असंख्य प्रकार आहेत. योगाची अनुलोम विनुलोन ही आसनं श्वसन संस्था मजबूत करण्यासाठी मोठी मदत करतात.

प्रत्येकानं प्राणायमा ला आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवावं. योगामुळे तसेच प्राणायामामुळे कोरोना झालेल्या लोकांनाही यातून बाहेर पडण्यासाठी ताकद मिळत आहे. योगामुळे मानसिक शांती व व तसेच शारीरिक शक्ती सुद्धा मिळते. संयम सहनशक्तीही मिळते, असं भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here