लेह-लडाख | पंतप्रधान मोदी यांनी आज लडाखमध्ये येथे जाऊन जवानांना भेट दिली. तसेच भारत आणि चीनची सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर जवानांचे मनोधैर्य वाढवले.याच वेळी पंतप्रधान मोदींनी जवानांची संवाद साधत चीनला थेट सीमेवरून इशारा दिला.
आताचे युग हे विकास वादाचे युग आहे. विस्तारवाद चे युग संपले , असा इशारा देत हे युग विकासवादाच आहे आणि विस्तारवादावरून संपूर्ण जग आता एकवटलं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. तसंच या काळात विकासवादच भविष्याचा आधार आहे, असंही मोदी म्हणाले.
विस्तार वादामुळे संपूर्ण जगाला धोका आहे तसेच विस्तारवादाणे माणूस की चे मोठे नुकसान झालेले आहे.विस्तारवादाने माणुसकीचं मोठं नुकसान झालेलं आहे. भारत-चीन संघर्षाच्या पार्श्वभूमीवर आता सीमेवरचा खर्चही आता तिपटीने वाढवलं आहे, असंही मोदींनी सांगितलं.
मी कोणत्याही संरक्षणात्मक बाबीचा विचार करत असताना किंवा निर्णय घेत असताना प्रथम दोन मतांचा विचार करत असतो. एक म्हणजे भारत माता आणि दुसरं म्हणजे जवानांच्या वीर माता .या दोन्ही बाबींचा मी विचार करतो. दरम्यान गलवान खोऱ्यात झालेल्या घटनेबद्दल जवानांच्या शौर्या चा संपूर्ण देशाला अभिमान आहे. असे म्हणत नरेंद्र मोदींनी जवानांचे मनोबल वाढवले.
इथे ही वाचा
इंदुरीकर महाराजांना चढावी लागणार कोर्टाची पायरी….
CA परीक्षेबाबत निर्णयाची शक्यता….
भाजप नेत्यांनी प्रियांका गांधींवर केली टीका,”नातीन आजीच नाक कापलं…”