पृथ्वीराज चव्हाण-म्हणून महाराष्ट्रातील वाढत्या कोरोनाच्या प्रभावाला केंद्र सरकारच जबाबदार

सातारा | राज्यातील कोरोनाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी आणि भाजप नेत्यांमध्ये सध्या चांगलेच आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर गंभीर आरोप केले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलं होतं.

आता माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील देवेंद्र फडणवीस यांचे आरोप खोडून काढले आहेत. राज्यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णांची संख्या ही केंद्र सरकारचीच चूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ते एबीपी माझा या वृत्तवाहिनीसोबत बोलत होते.

जागतिक आरोग्य संघटनेनं कोरोनाला जागतिक महामारी घोषित केल्यानंतरही केंद्र सरकारनं गांभीर्य ओळखलं नाही. दुर्दैवाने मुंबई विमानतळ सुरू ठेवलं. दररोज 16 हजार प्रवासी येत होते. त्या चौदा दिवसात किती प्रवासी आले असतील? जे प्रवासी आले त्यांना होम क्वॉरंटाईन केलं नाही त्यामुळे हा आजार राज्यात पसरला आणि याची जबाबदारी केंद्र सरकारने स्वीकारली पाहिजे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं आहे.

कोरोनाच्या परिस्थितीला महाराष्ट्र सरकार चांगल्या प्रकारे सामोरे जात आहे. केंद्र सरकारने काही सूचना असतील तर त्या कराव्यात. राज्य सरकार सर्व सूचनांचं पालन करतंय, असंही ते म्हणाले.

इथे हि वाचा 

केंद्रीयमंत्री रामदास आठवेल यांचा नारायण राणे यांना पाठिंबा

मृत्यू घराचा पहारा करतांना” :- पोलीस नाईकांचे मनोगत

निलेश राणेंच्या वक्तव्याचा जाहीर निषेध..! आम्ही तृतीयपंथी समूहाच्या बाजूने आहोत-प्रकाश आंबेडकर

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: