पुणे-पहिल्या लॉकडाऊन च्या काळात सरकार ने घरभाडे घेणाऱ्या मालकांना तीन महिने घर भाडे मागतांना शिथिलता ठेवावी, भाडेकरूंना घराच्या बाहेर न काढावे असे आव्हान केले होते. तरी राज्यात मनमानी पध्द्तीने घरभाडे घेणे सुरूच आहे पुण्यात राहण्याऱ्या MPSC ची परीक्षा देणारी तरुणीला घर मालकीची सतत भाडे मागत होती. भाडे नाही तर घर खाली कर अश्या धमक्या देत होती. याच प्रकरणी त्या तरुणीने श्रेया नाव असलेल्या घरमालकानीच्या विरोधात गुन्हा दाखल केला. मेघा नावाच्या या तरुणीने संदर्भात तक्रार दिली होती.
गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंग यांच्याकडे यासंदर्भात आली होती.त्यानुसार या तक्रारीची शहानिशा झाल्यानंतर घर मालकाविरुद्ध विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे भादवि 188, 506(1), राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा क. 51(ब), साथीचे रोग प्रतिबंधक कायदा क. 2,3,4 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
दरम्यान, राज्य शासनाच्या गृहनिर्माण विभागाची सूचना प्रसिद्ध झालेली असून जगभर पसरलेल्या कोविड19 साथीच्या रोगाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीमुळे कोणत्याही घरमालकाने भाडेकरूकडून सक्तीने घर भाडे वसूल करू नये. तसेच किमान 3 महिने वसुली पुढे ढकलावी अशा लेखी सूचना देण्यात आलेल्या आहेत.