राफेलचा व्यवहार करारानुसार झाला नाही; कॅगच्या अहवालाने मोदी सरकार अडचणीत येण्याची शक्यता..

राफेलचा व्यवहार करारानुसार झाला नाही; कॅगच्या अहवालाने मोदी सरकार अडचणीत येण्याची शक्यता..

नवी दिल्ली – राफेल विमानांच्या खरेदीवरून देशात अनेकदा सरकार आणि विरोधक आमने सामने आले आहेत. त्यातच आता कॅगच्या अहवालाने विरोधकांना सरकारवर टीका करण्याची संधी मिळणार आहे. डिफेन्स ऑफसेटवर कॅगचा अहवाल जाहीर करण्यात आला असून त्यात राफेल तयार करणाऱ्या कंपनीने कराराची पूर्तता केली नसल्याचं म्हटलं आहे. राफेलचा करार करताना डीआरडीओला उच्च तंत्रज्ञान देऊन विक्रेता कंपनी 30 टक्के ऑफसेटची पूर्तता करेल असं म्हटलं होतं. मात्र अजुनही करारानुसार हस्तांतरण झालेलं नाही.

स्वदेशी तेजस लाइट कॉम्बॅट एअरक्राफ्टचं इंजिन विकसित करण्यासाठी या तंत्रज्ञानाची गरज होती. पण अद्यापही डसॉल्ट एव्हिएशनने ते केलं नसल्याचं कॅगने अहवालात नमूद केलं आहे.
कॅगने अहवालात ऑफसेट पॉलिसीमुळे जे हवं होतं ते साध्य झालं नसून याचा आढावा मंत्रालयानं घेण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे. अडचण काय आहे ते शोधून त्यावर लवकरात लवकर तोडगा काढण्याची आवश्यकता आहे.  राफेल जेट्स डसॉल्ट एव्हिएशन या कपंनीने तयार केली असून MBDAने यामध्ये क्षेपणास्त्र प्रणाली बसवली आहे. यासंदर्भात कॅगने अहवाल सादर केला असून त्यामध्ये संबंधित कंपनी भारताला मोठं तंत्रज्ञान देत नसल्याचं म्हटलं आहे.

Source:- esakal

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.

%d bloggers like this: