रघुराम राजन -येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात मोठी वाढ होऊ शकते

नवी दिल्ली | भारतातल्या बुडीत करजा संदर्भात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा चिंता व्यक्त केली आहे. येत्या सहा महिन्यांत बँकांच्या एनपीए-नॉन परफॉर्मिंग ऍसेटमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. त्याचबरोबर रघुराम राजन म्हणाले, समस्या जितक्या लवकर समजेल तितकच फायदेशीर असल्याचं त्यांनी सांगितलं.

नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च आयोजित इंडिया पॉलिसी फोरम 2020 च्या अधिवेशनात रघुराम राजन यांनी सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते.

एमपीएससी वास्तविक पातळी जर आम्हाला खरोखर समजली, तर पुढील सहा महिन्यांत एनपीएची पातळी अगदीच अनपेक्षित होईल, असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

जनधन खात्याची जाहिरात झाली, त्याप्रमाणे काम झाले नाही. कृषी क्षेत्र हे भारतीय अर्थव्यवस्थेचे एक सकारात्मक परिणाम आहे. हे क्षेत्र खरोखर चांगले काम करत आहे. अर्थातच मोदी सरकारने सुधारणांना वाव दिला आहे. तत्पूर्वी बराच काळ या सुधारणांची चर्चाच होत होती,त्याच बरोबर आता त्यांची अंमलबजावणी झाल्यानं अर्थव्यवस्थेचा तो मोठा भाग ठरणार आहे, असं राजन म्हणालेत.

इथे ही वाचा

केंद्र सरकारने केलं लॉन्च जगातील सर्वात स्वस्त कोरोना टेस्ट किट..

केंद्र सरकारने केलं लॉन्च जगातील सर्वात स्वस्त कोरोना टेस्ट किट..

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

Related Posts

Leave a Reply

Your email address will not be published.